सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (14:54 IST)

आई-मुलाला कारची भीषण धडक, पुलावरून कोसळून मृत्यू

नागपूर-  एका धक्कादायक दुर्घटनेत एका कारने दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक एवढी भयंकर होती की दुचाकीवर बसलेल्या आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
 
नागपूर जिल्ह्यातील मौदा माथनी येथील कन्हान नदीच्या पुलावर ही घटना घडली ज्यात स्विफ्ट कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आई आणि मुलगा पुलावरून खाली कोसळले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
 
राजू तिजारे हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह दुचाकीने भंडाऱ्याकडे जात होते. तेव्हा पूल ओलांडत असताना स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. त्यात पत्नी भारती तिजारे आणि 12 वर्षाचा मुलगा कृष्णराज तिजारे याचा मृत्यू झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये पाच तरुण असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अपघातानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस सध्या या आरोपीचा शोध घेत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.