मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 एप्रिल 2021 (16:24 IST)

खासदार उदयनराजे भोसले यांचा सरकारला इशारा

राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास लोकं आणि मी ऐकणार नाही. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. त्यानंतरही शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तो आम्हाला मान्य नाही. यावरून मारामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्यासाठी सरकार जबाबदार असेल. लोकं पोलिसांना चोपून काढतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. 
 
खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते. या प्रतिकात्मक आंदोलन केले. 
 
यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. लोकांची आर्थिक अवस्था सरकारने लक्षात घेतली पाहिजे. लॉकडाऊन झाल्यास लोकांची उपासमार होईल. सरकारमधील कोणते तज्ज्ञ लॉकडाऊनचा निर्णय घेतात, असा सवालही त्यांनी विचारला. या लोकांच्या पाहिले तर ते कुठल्याही दृष्टीकोनातून तज्ज्ञ वाटत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत वैद्यकीय समुदाय किंवा शास्त्रज्ञ लॉकडाऊनची गरज आहेच, असा अहवाल देत नाहीत, तोपर्यंत आम्ही लॉकडाऊन लागू देणार नाही, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
 
‘प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज लसींचा तुटवडा जाणवला नसता’
देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केले होते. देशात लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले होते.
 
शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत. माणूस जगण्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच मार्ग आहे. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो, अशा माझ्या सदिच्छा असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.