1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (15:04 IST)

Mulund : आईनेच बाळाला 14 व्या मजल्यावरून खाली फेकले, बाळाचा मृत्यू

Born Child
मुंबईच्या मुलुंड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका इमारतीत राहणाऱ्या आईनेच आपल्या पोटच्या बाळाला 14 व्या मजल्यावरून फेकले आहे. या प्रकरणात बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आईने मानसिक तणावाखाली हे कृत्य केल्याचे समजले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 
सदर घटना मुलुंडच्या नीलकंठ नावाच्या इमारतीची आहे. येथे एका महिलेने मानसिक तणावात येऊन आपल्या बाळाला इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून खाली फेकले.

काही दिवसांपूर्वी या महिलेच्या वडिलांचे निधन झाले. हा धक्का तिला सहन झाला नाही आणि तिला मानसिक तणाव झाला. तिच्या वडीलांच्या मृत्यूचा तिच्या मनावर परिणाम झाला. तिच्या बळावर वडिलांचे खूप प्रेम होते. बाळाला पाहून तिला वडिलांची आठवण येत असे. तिने गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास उठली आणि अवघ्या 39 दिवसांच्या  बाळाला घराच्या खिडकीतून 14 व्या मजल्यावरून फेकून दिले. 

बाळ खिडकीतून इमारतीच्या खाली असलेल्या एका दुकानावर पडले. इमारतीच्या एका व्यक्तीने दुकानाच्या छतावर बाळ खाली पडताना पहिले. त्याने पोलिसाना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बाळाच्या मृतदेहाला ताब्यात घेतले.असून महिलेच्या विरोधात तक्रार नोंदली असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit