1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2019 (09:14 IST)

स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक

mumbai bridge cst
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील पादचारी पूलदुर्घटने प्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेलस स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक करण्यात आली आहे. सदोष मनुष्यवधाप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी पूल दुर्घटनाप्रकरणी मुख्य अभियंता एस. ओ. कोरी, ए. आर. पाटील, उपमुख्य अभियंता आर.बी.तारे आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे.
 
स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या देसाई कन्सल्टन्सला काळ्या यादीत टाकले आहे. तर कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.