बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मार्च 2019 (09:27 IST)

महंत सुधीर पुजारी यांना दुबईत अटक

नाशिक येथील पूर्ण देशात प्रसिद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केलेलं श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीर पुजारी यांना शाही घराण्याच्या नावाचा वैयक्तिक स्वार्थासाठी गैरवापर केल्याप्रकरणी दुबईत अटक केली होती. मात्र भारतीय अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर महंत पुजारी यांची जामीनावर सुटका करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क असलेल्या महंत सुधीर पुजारी यांनी दुबईत वेगवेगळ्या नावाने तीन कंपन्या स्थापन केल्या असून त्यांना शाही घराण्यातील सदस्यांच्या तक्रारीवरुन दुबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आर्थिक कमाई, संपत्तीसाठी शाही घराण्याच्या नावाचा महंत पुजारी यांनी गैरवापर केल्याची तक्रार करण्यात आली आहे. मात्र महंत पुजारी यांना जामीनावर सोडण्यात आले असले तरीही त्यांचा पासपोर्ट पोलिसांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी अजून वाढणार आहे. काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता.