सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2023 (10:36 IST)

Mumbai : मुंबईच्या मार्वे बीचवर समुद्रात पोहायला गेलेली 5 मुले बुडाली,दोघे वाचली

सध्या पावसाळा सुरु आहे. लोक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा पाण्याच्या ठिकाणी सहली साठी जात आहे. पाण्याच्या ठिकाणी अनेकदा निष्काळजीपणामुळे अपघात घडतात. नुकतीच मुंबईच्या वांद्रेबॅण्डस्टॅण्ड चा अपघात घडला असून आता पुन्हा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर अपघात आहे. मुंबईच्या मार्वे बीच वर पोहण्यासाठी गेलेली पाच मुले बुडाली असून त्यात दोघांना वाचविण्यात यश आले असून अजून तीन मुले बेपत्ता आहे. शुभम राजकुमार जैस्वाल (12), अजय जितेंद्र हरिजन(12) आणि निखिल साजिद कायमकूर (13)असे बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत.

कृष्णा हरिजन, अंकुश भरत शिवारे, शुभम जैस्वाल, निखिल साजिद कायमकूर आणि अजय जितेंद्र हरिजन ही 5 मुले मालाडच्या मार्वे बीचवर अंघोळ करण्यासाठी गेली होती. पावसामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाण्याच्या अंदाज मुलांना आला नाही आणि समुद्राच्या पाण्यात ही मुले बुडाली असून जितेंद्र आणि अंकुश या दोघांना वाचविण्यात यश आले असून  इतर तिघे बुडाले आहे. या बेपत्ता मुलांचा  शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि बीएमसीचे पथक बोटी , लाईफ जॅकेट आणि इतर उपकरणाचा वापर करून मुलांचा शोध घेत आहे. 
 
Edited by - Priya Dixit