Gujrat : गुजरातमधील कृष्णा सागर तलावात बुडून 5 मुलांचा दुर्देवी मृत्यू
गुजरातमधील कृष्ण सागर तलावात बुडून 5 मुलांचा मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना घडली आहे.गुजरातमधील बोताड जिल्ह्यात तलावात बुडून पाच मुलांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बुडालेल्या मुलांचा शोध सुरू केला. तलावात बुडून जीव गमावलेल्या सर्व मुलांचे वय 16 ते 17 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.
बोताड शहराबाहेर कृष्णसागर तलाव आहे. दोन मुले आजोबांसोबत बोताड तलाव पाहण्यासाठी आल्याचे सांगण्यात येत आहे. तलाव पाहण्यासाठी गेलेल्या मुलांनी आजोबांकडून तलावात आंघोळ करण्याचा हट्ट सुरू केला. मुलांच्या सांगण्यावरून आजोबांनी त्यांना तलावात आंघोळ करायला दिली. आजोबांची परवानगी मिळाल्यानंतर मुले तलावात आंघोळीसाठी गेली.
तलावात आंघोळ करत असलेली मुले अचानक खोल पाण्यात गेली आणि बुडू लागली. तलावात आंघोळ करणाऱ्या मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे पाहून शेजारी उपस्थित असलेल्या तीन मुलांनीही तलावाच्या खोल पाण्यात उडी मारली.
बोताडचे पोलीस अधीक्षक ( एसपी) किशोर बलोलिया यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी तलावात 5 मुलांचा बुडून मृत्यू झाला.दुपारी दोन मुले तलावात पोहत असताना ते बुडू लागले, यावेळी तेथे उपस्थित असलेल्या आणखी 3 मुलांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तलावात उडी मारली, मात्र हे तिघेही तलावात बुडाले. या मुलांचे वय 16 ते 17 वर्षे आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Edited by - Priya Dixit