बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (16:19 IST)

दुहेरी हत्याकांड : दिराने केली वहिनी आणि पुतण्याची हत्या

नवी मुंबईतील पनवेलच्या कामोठेमध्ये  दिराने वहिनी आणि पुतण्याची हत्या केली आहे. कामोठे सेक्टर 34 मधील एकदंत सोसायटीमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. अवजड वस्तू डोक्यात घालून दिराने वहिनी आणि पुतण्याची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घरगुती वादातून ही हत्या झाली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.वहिनी जयश्री चव्हाण आणि 2 वर्षाचा पुतण्या अविनाश चव्हाण अशी मृतांची नावं आहेत. तर सुरेश चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी दिर हा त्यांच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला होता. तो कोणतीच प्रतिक्रिया देत नाही आहे. दरम्यान, हत्या झाल्याचं शेजारील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. कामोठे पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी सुरेश चव्हाण याला ताब्यात घेतलं आहे. तर संपूर्ण तपासानंतर त्याच्यावर दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.