नाशिकजवळील दिंडोरी कोकणगाव खुर्द गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली. मंगळवार रात्री 8 ते 10 च्या सुमारास तिघांची हत्या झाली. एक टोळकं रात्रीच्या सुमारास शेळके कुटुंबाच्या शेतातील घरात घुसलं. त्यानंतर त्यांनी कुऱ्हाडीचे वार करुन शेळके कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा अशा तिघांचा खून केला. त्यानंतर तिथून पोबारा केला. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.