सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 एप्रिल 2023 (09:12 IST)

माझा जपान दौरा अर्धवट राहिला नाही, अगदी यशस्वी झाला - नार्वेकर

अजित पवार ४० आमदारांसह भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण अजित पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार आहे, असं स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जपान दौरा अर्धवट सोडून महाराष्ट्रात परत आले. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात सत्तांतर घडणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी स्वत: जपान दौऱ्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
 
महाराष्ट्रात राजकीय बदल होणार आहेत का? कारण तुम्ही तुमचा परदेश दौराही अर्धवट सोडला आहे, याबाबत विचारलं असता नार्वेकर म्हणाले, “माझा जपान दौरा अर्धवट राहिला नाही. माझा हा दौरा अगदी यशस्वी झाला आहे. जपानला गेल्यानंतर आम्ही तेथील अनेक मुलभूत सुविधांच्या प्रकल्पांची पाहणी केली आहे. कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचीही पाहणी केली. जपानमधील सगळ्या महत्त्वाच्या बैठका उरकून मी महाराष्ट्रात आलो.”
 
Edited by: Ratnadeep Ranshoor