1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 सप्टेंबर 2023 (20:25 IST)

Nagpur : मेट्रो ट्रेनमध्ये रंगला फॅशन शो, व्हिडीओ व्हायरल

nagpur metro
social media
Fashion Show In Metro Train : मेट्रोशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. मेट्रोमध्ये मारामारीसारख्या विचित्र गोष्टी करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मेट्रो मध्ये आपण सीटसाठी भांडण होताना बघितले आहे आणि ऐकले देखील आहे. अनेकवेळा लोक स्वतः व्हायरल होण्यासाठी अशा गोष्टी करतात. डान्सचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यामध्ये प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमध्ये लोक नाचू लागले. पण मेट्रोमध्ये चक्क फॅशन शो झालेला प्रथमच ऐकत आहोत. नागपुरात चालत्या मेट्रो मध्ये फॅशन शो सुरु झाल्यामुळे प्रवासी देखील आश्चर्यचकित झाले. हा शो 28 ऑगस्ट रविवारी  रोजी झाला.  
 
वीकेंडची वेळ होती, पण त्यावेळी ट्रेनमध्ये बरेच लोक उपस्थित होते. मॉडेल्सनी परिधान केलेले कपडे अनेक फॅशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी बनवले होते. या फॅशन शोची एक खास गोष्ट म्हणजे 2 वर्षापासून ते 50 वर्षांपर्यंतच्या लोकांनी यात भाग घेतला. यामध्ये विविध गटातील लोक सहभागी झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर मेट्रो 'सेलिब्रेशन ऑन व्हील्स' ही योजना राबवते. 
 
या अंतर्गत विविध संस्था, गट आणि व्यक्तींना शुल्क आकारून असे कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जाते. नागपूर मेट्रोमधील फॅशन शोचा व्हिडिओ एका युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर शेअर केला आहे.  


Edited by - Priya Dixit