गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (08:49 IST)

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्या -खासदार धनंजय महाडिक यांची मागणी

dhananjay mahadik
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी ऐंशी वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये विमानतळ उभारून विमानसेवा सुरू केली होती. त्यावरून त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या जनतेसाठी सुरू केलेली अनेक विकासाची, जनहिताची कामे पूर्ण करण्याचे श्रेय छत्रपती राजाराम महाराज यांनाच जाते. त्यांचेच नाव कोल्हापूरच्या विमानतळाला देण्यात यावे, अशी जुनी मागणी आहे. या प्रलंबित मागणीची पूर्तता करावी, अशी मागणी भाजप नेते खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांच्याकडे केली.
 
खासदार महाडिक यांनी शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री सिंधिया यांची भेट घेऊन त्यांच्याशी कोल्हापूर विमानतळाच्या संबंधित विविध प्रश्न आणि मागण्यांवर चर्चा केली. कोल्हापूर विमानतळाच्या नाईट लँडिंगसह विस्तारीकरणासह परवानगी दिल्याबद्दल सिंधिया यांचे आभार मानले. विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंगचे काम पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरात लवकर अधिकाऱयांची बैठक आयोजित करावी, अशी मागणीही खासदार महोडिक यांनी यावेळी केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भिमा सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन विश्वराज महाडिक उपस्थित होते.
 
महाडिक यांनी केलेल्या मागण्या
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवडय़ात 3 ऐवजी 5 दिवस सुरू करा.
बंद असलेल्या कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-बेंगळूर विमानसेवा सुरू करा.
कोल्हापूर-गोवा मार्गावर विमानसेवा सुरू करा.
-विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्चपर्यंत पूर्ण व्हावे.
 
 Edited By- Ratnadeep Ranshoor