शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 जुलै 2023 (21:47 IST)

नाशिक : छगन भुजबळ यांचा शरद पवारांना मिश्किल टोला

शरद पवार साहेबांचे माझ्यावर अतोनात प्रेम आहे. कारण राष्ट्रवादीची निर्मिती झाली तेव्हा पहिला नेता म्हणून मी त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे त्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घ्यायचा निर्णय घेतला आहे. असा मिश्किल टोला छगन भुजबळ यांनी पवारांना लगावला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. 
 
भुजबळ पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी घेतलेला निर्णय लोकांना मान्य झाला आहे. त्यामुळे आम्हाला जागोजागी प्रतिसाद मिळत आहे. ठाणे, भिवंडी पासून ते इगतपुरी व नाशिक पर्यंत लोकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
 
आव्हाड म्हणाले की, तुम्ही परत या, आम्ही बाजूला होतो? यावर छगन भुजबळ म्हणाले की, आता उशीर झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून आम्ही साहेबांना सांगत होतो. कल्पना देत होतो पण त्यांनी दुर्लक्ष केले. आता देर आये, दुरूस्त आये याचा काहीही फायदा होणार नाही. पूर्वकल्पना होती तेव्हा काही केले नाही, त्यामुळे मी ज्यांचा बडवे म्हणून उल्लेख केला त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.
 
छगन भुजबळ म्हणाले की, नाशिककर जनतेचा आभारी आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी पासून ते इगतपुरीपर्यंत अनेक कार्यकर्ते बांधव, महिला बहीणी हे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. याचा अर्थ होतो की, जनतेला अजित पवार आणि आम्ही घेतलेला निर्णय पसंद पडला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित आहेत. जागोजागीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. आता निर्णय झाला, लोकांच्या आशिर्वादाने कामाला लागतो आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा नाशिकसाठी काम केले आहेत. आता मिळालेल्या संधीतून पुन्हा नाशिककरांचे काम करत राहणार आहोत. जनतेच्या कामांना प्राधान्य देत राहू असे सांगितले. 
 
Edited By - Ratnadeep Ranshoor