शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (20:57 IST)

नाशिक :लाचखोर तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या पोलीस कोठडीत वाढ..!

jail
नाशिक जिल्ह्यातील तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना १५ लाखांची लाच घेताना एनसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर नरेशकुमार बहिरम यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बँक लोकर आणि अन्य मालमत्ता चौकशी करण्यासाठी एनसीबीने दोन दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती.
 
अंबड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक ४९२/ २०२३ मधील आरोपी नरेशकुमार बहिरम यांना (१० ऑगस्ट) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर चौकशी नंतर अजून काय माहिती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. बहिरम यांच्या कर्मयोगी नगर येथील निवासस्थानाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. गौण खनिज प्रकरणातील दंडाची रक्कम कमी करण्यासाठी बहिरम यांनी लाच मागितली होती. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास पकडले. बहिरमविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
गेल्या तीन दिवसाआधी लाचखोर बहिरम यांनी १५ लाखांची लाच मागितली होती. त्यानंतर लाचखोर तहसीलदार बहिरम यांच्या घरात सुमारे २५ लाख रुपये किंमत असलेले ४० तोळे सोने सापडले आहे. तसेच ४ लाख ८० हजार रुपयांची रोकड देखील बहिरम यांच्या घरात सापडली आहे. त्यानंतर आता बहिरम यांचे बँक खाते, बँक लॉकर, अन्य स्थावर मालमत्ता या सर्वांचीच झडती एसीबीकडून घेतली जाणार आहे. न्यायालयाने कोठडी सुनावताच एसीबीच्या पथकाकडून आणखी आक्रमकपणे तपास केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
 
एक ऑगस्टपासून जिल्ह्यात महसूल सप्ताहाला उत्साहात सुरूवात झाली. या विभागामार्फत नागरिकांना सध्या १३२ योजनांचा लाभ दिला जात असून शासकीय योजनांच्या अमलबजावणीत नाशिक महसूल विभाग आघाडीवर असल्याचे सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी अभिमानाने सांगितले गेले होते.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor