शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 सप्टेंबर 2023 (12:27 IST)

Nashik : नाशिक मध्ये बांधकाम व्यावसायिकाचे घरासमोरून अपहरण

नाशिक मध्ये एका बड्या व्यावसायिकाचे त्याच्या घरासमोरून अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हेमंत पारख असे या व्यावसायिकाचे नाव असून ते बांधकाम व्यवसायी आणि गजरा ग्रुपचे प्रमुख आहे. त्यांचे अपहरण त्यांच्या राहत्या घरासमोरून इंदिरानगर भागातून रात्री 9: 30 च्या सुमारास ते घरासमोर फिरत असताना  केले. काही अज्ञात व्यक्ती कार मधून आले आणि त्यांचे अपहरण करून नेले. 

घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळ गाठले त्यांचा शोध घेण्यासाठी शोध पथके नेमण्यात आली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. अपहरण करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.    

राहत्या घराच्या समोरून झालेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी शोध सुरु केला असून शहरात नाकेबंदी करून प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. घटनेला अद्याप आठ तास लोटले असून पारखांचा शोध अद्याप लागला नाही.  
 
Edited by - Priya Dixit