संबंधित माहिती
- तीन वाहनांचा अपघात; ४ भाविक ठार तर ५ जण जखमी
- ट्रकच्या धडकेनं टँकर पलटी, आगीचा उडाला भडका, 2 जणांचा मृत्यू
- प्रेम भंग प्रकरणातून नकार दिल्याने प्रियकराने तरुणीचा गळा चिरून खून केला, आरोपी ताब्यात
- पाकिस्तान: कुर्रम जिल्ह्यात दोन गटांमध्ये संघर्ष, 10 ठार, 15 जखमी
- नात्याला काळिमा : बापानेच रागाचा भरात येऊन सावत्र मुलाचा खून केला,आरोपी बापाला अटक
नाशिकमध्ये तलावात बुडवून विद्यार्थ्याची हत्या
नाशिकमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मारामारीमध्ये एका विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागले. वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरु असताना तो पुन्हा उफाळून आला आणि त्याचं पर्यवसन जबर हाणामारीत झालं. मारामारी करताना दोघं जण तलावात पडले आणि यावेळी एका विद्यार्थ्याची पाण्यात बुडवून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. हाणामारीच्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांमधील वाढत्या हिंसाचाराची दुसरी घटना आठवड्याभरात समोर आली आहे. शाळकरी मुलांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाची हत्या करण्यात आली. तलावात बुडवून केलेल्या बेदम मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
