बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 26 जुलै 2021 (19:20 IST)

एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीला देणार, नवाब मलिक यांची माहिती

राष्ट्रवादीचे मंत्री, राज्यमंत्री सर्व खासदार तसेच आमदार एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री रिलीफ फंडात पूरग्रस्त लोकांसाठी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर केले. त्यानंतर या घोषणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अधिक माहिती दिली. अजित पवार यांनी वेतन देण्यासंबंधीची घोषणा केली आहे. तसेच आगामी एक- दोन दिवसात नेमकी काय मदत केली जाईल हे पक्षाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल, असेही मलिक यांनी सांगितले आहे.  
 
एक- दोन दिवसात नेमकी काय मदत केली जाईल हे जाहीर करणार 
पत्रकार परिषदेत बोलताना, “सरकार आपल्या परीने मदत करेल. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणखी मदत देता येईल का याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सर्वांशी चर्चा करुन घेत आहेत. त्यामुळे एक- दोन दिवसात नेमकी काय मदत केली जाईल, हे पक्षाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल,” असे नवाब मलिक म्हणाले.