शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (14:49 IST)

हर हर महादेव चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये :राज ठाकरे

raj thackeray
हर हर महादेव चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रवक्त्यांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस या विषयाला जातीय रंग देत असून सध्या आपण या विषयावर बोलू नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. 
 
हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप माजी खासदार संभाजीराजे यांनी केला. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे येथील विवियाना मॉलमध्ये चित्रपटाचा शो सुरू असतानाच राडा झाला. या आंदोलनानंतर चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध केला. खरी शिवभक्ती काय असते, ते राज ठाकरे यांच्याकडून शिका, असा टोला त्यांनी लगावला.
Edited by : Ratnadeep Ranshoor