शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2017 (09:28 IST)

लेखक, दिग्दर्शक, गीतकार अजेय झणकर यांचे निधन

लेखक, दिग्दर्शक, गीतकार अशी ओळख असलेल्या अजेय झणकर यांचे निधन झाले आहे. पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात झणकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘सरकारनामा’ चित्रपटातून राजकीय संघर्ष त्यांनी गडद केला होता. झणकर यांचं शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं होतं. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांनी लेखनाचे विशेष पारितोषिक पटकावल्यानंतर त्यांच्या लेखनप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
 
झणकर यांनी जाहिरात क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ‘मार्केट मिशनरीज’ संस्थेचे ते संस्थापक होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या मुंबई आवृत्तीसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केलं. झणकर यांच्या ‘सरकारनामा’ व ‘द्रोहपर्व’ या दोन कादंबऱ्यांनी मराठी साहित्यविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं.

‘लेकरु’ या चित्रपटाचे निर्माते आणि पटकथाकार म्हणूनही झणकर प्रसिद्धीस आले. ‘वडगावच्या लढाईत इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान 1779 सालीच पारतंत्र्यात गेला असता,’ असं सांगणारी ‘द्रोहपर्व’ ही  त्यांची कादंबरी गाजली. ‘दोहपर्व’ कादंबरीवर ‘सिंग्युलॅरिटी’ हा हॉलिवूड चित्रपट तयार झाला. मराठी लेखकाच्या साहित्यकृतीवर बेतलेला हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट ठरला.