मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आता ऑनलाईन अपॉईंटमेंट; नाशिक मनपाची सुविधा  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  कोविड-१९ परिस्थितीमुळे वाढलेल्या मृतदेहांचे अंत्यसंस्कारामुळे नागरीकांना मृतदेहांचे अंत्यसंस्काराकरीता प्रतिक्षा करावी लागत आहे. यातून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 
				  													
						
																							
									  
	 
	या बाबीचा विचार करून मृतदेहांचे अंत्यसंस्कार विधीकरीता नागरीकांना होणारा त्रास कमी करणेच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेने Web Application (www.cremation.nmc.gov.in) तयार केलेले आहे. सदरचे अँप्लिकेशन नाशिक महानगरपालिकेच्या e-connect Application ला  देखील कनेक्ट करण्यात आलेले आहे.
				  				  
	 
	नागरीकांना या Application चा वापर करून आपल्या नजिकच्या अमरधाम येथील अंत्यसंस्काराबाबतची सद्यस्थिती जाणून घेता येईल व Application मध्ये आवश्यक माहिती भरून त्याना पाहिजे त्या विभागातील अमरधाम येथील स्लॉट बुक करता येणार आहे.स्लॉट बुक झाल्यानंतर आपणस एक मेसेज येईल व त्या ठिकाणी आपण आपली बुकिंग रिसिप्ट सुद्धा डाउनलोड करता येणार आहे. या आप्लिकेशनच्या साह्याने नागरिकांना सर्व विभागात असलेल्या अमरधाम गुगल लोकेशन च्या माध्यमातून शोधणे सुद्धा सुलभ होणार आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	नाशिक शहरात सर्व विभागात एकूण २७ अमरधाम असून या अमरधाम मध्ये ९० बेड आहेत आणि नागरिकांना या अँप्लिकेशन  मध्ये  त्याना त्या भागातील सेवा देणाऱ्या सर्व व्यक्तींचे नाव व  मोबाइल नंबर दिलेला आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणची सध्याच्या स्थितील माहिती घेणे सुद्धा सुलभ होणार आहे. या Application मुळे नागरीकांना करावी लागणारी प्रतिक्षा व मानसिक त्रास दूर होण्यास निश्चितच मदत होईल. याकरीता, कुठलेही शुल्क आकारले जाणार नसून, सदरची सुविधा हि मोफत असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.