रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:21 IST)

आता ‘या’ अभिनेत्रीची राजकाराणात इन्ट्री

asawari joshi
अभिनेत्री आसावरी जोशी यांनी मराठी सिनेसृष्टी नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीत आपली जागा निर्माण केली. इतकेच नव्हे तर अभिनेत्री आसावरी जोशी आता राजकारणात सुध्दा इन्ट्री करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज कलाकार, संगीतकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना पाहायला मिळत आहे.
 
येत्या 15 फेब्रुवारीला अभिनेत्री आसावरी जोशी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात (प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आसावरी जोशी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. पक्षप्रवेश मुंबई येथे होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , सुप्रिया सुळे  यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहे. आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली आहे.