शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 एप्रिल 2021 (09:50 IST)

आता हाय रिस्क आणि लो रिस्क मधील नातेवाईकांचा शोध आणि चौकशी

कोरोना विषाणु (कोव्हीड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत नाशिक महानगरपालिका अंगणवाडी प्रकल्पावर कार्यरत असलेल्या 6 विभागातील 550 अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्या नाशिक मनपा क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र,झोपडपट्टी, तसेच इतर रहिवाशी क्षेत्रामध्ये वैद्यकिय विभागाचे पथकाबरोबर घरोघरी जाऊन कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांचे सर्व्हेक्षण व जनजागृतीचे कामकाज करत असल्याची माहिती उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली आहे.
 
मनपाच्या अंगणवाडी सेविका / मदतनिस व आशा कर्मचारी हे कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत जे रुग्ण कोव्हीड-19 ने बाधित झाले असल्याचे आढळून आलेले आहे व जे रुग्ण गृहविलगीकरणामध्ये आहेत अशा रुग्णांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन रुग्णांची चौकशी करत आहे,कोव्हीड 19 ने बाधीत झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या HIGH RISK व LOW RISK मधील नातेवाईकांचा व नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या आरोग्याची चौकशी करत आहे.
 
कोरोना गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या व त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांच्या हातावर गृहविलगीकरणाचे तारखेसह नोंद करुन, हातावर शिक्के मारणे, रुग्णांच्या घरावर गृहविलगीकरणाबाबतचे स्टीकर्स लावणे, गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची नियमित चौकशी करुन आवश्कतेनुसार UPHC केंद्रावरुन रुग्णांना औषधे, गोळया उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करणे, कोव्हीड लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचा-यांना मदत करणे जसे नागरिकांना सामाजिक अंतराने उभे राहणे,लसीकरण झालेनंतर नागरिकांना अर्धा तास प्रतिक्षागृहामध्ये बसविणे त्यांचे आरोग्याची चौकशी करणे इ. कामकाज करत आहे.
 
तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नाशिक महानगरपालिकेच्या सर्व्हेक्षण पथकाच्या कर्मचा-यांना आवश्यक ती खरी माहिती देऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे कोव्हीड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे प्रशासनास सुलभ होईल असे आवाहन उपायुक्त अर्चना तांबे यांनी केले आहे.