रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जून 2022 (16:35 IST)

आता रेशन दुकानातही मिळणार भाजीपाला,राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारने रेशन दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी रेशनच्या दुकानात आता धान्यासह भाजीपाला आणि फळे विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कंपन्यांच्या शेतकरी सभासदांनी पिकवलेला भाजीपाला आणि फळे या विक्रीसाठी कंपनी ठेऊ शकते. असा निर्णय राज्यसरकार कडून घेण्यात आला आहे. 
 
सध्या पुढील सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ही परवानगी पुणे जिल्ह्यातील शाश्वत कृषी विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनी आणि फार्म फिस्ट शेतकरी उत्पादक लिमिटेड नाशिक या दोन कंपन्यांना पुणे, मुंबई-ठाणे क्षेत्रातील रेशन दुकानांमधून भाजीपाला आणि फळे विकण्याची देण्यात आली आहे. या कंपन्यांना हा व्यवहार करताना संबंधित कंपनी आणि घाऊक किंवा किरकोळ विक्रेते आणि रास्त भाव दुकानदारात राहील शासन या व्यापारात कुठला ही हस्तक्षेप करणार नाही आणि या कंपन्यांना फळे आणि भाजीपाल्यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा माल विकता येणार नाही. असे शासनाच्या निर्णयात सांगण्यात आले आहे.