रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जून 2022 (15:41 IST)

Jokes सासू सुनेचे मजेदार मराठी जोक्स

सासू - अगं सूनबाई उठा आता, सूर्य उगवला सुद्धा...
सून - तुम्हाला तेवढंच दिसणार... सूर्य माझ्या आधी झोपायला जातो, ते पण बघत जा जरा !
 
सून सासूच्या पाया पडते.
सासू - सुखी रहा...
सून - तुम्ही राहू देणार का?
 
सासू - हे तुझ्या आईचं घर नाही, नीट राहायचं.
सुन - तुमच्या तरी कुठे आईचं आहे ? तुम्ही पण नीट राहा.
 
सासू : सुनबाई हात मोकळे चांगलं नाही वाटत.
सून : मोबाइल चार्जिंगला लावला आहे आई.
सासू : अग भवाने मी बांगड्या बद्दल विचारते आहे...
 
सासू : बरं का सूनबाई... मी गरोदर असताना जे काही खाल्लं पिल्लं होत ना, आज तेच माझ्या मुलाला आवडतं...
सून : ते ठीक आहे हो आई, पण तुम्ही निदान दारू तरी टाळायला हवी होती...