मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (15:24 IST)

नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणाकडून तरुणीने उकळली साडेपाच लाखांची खंडणी

फेसबुक अकाऊंटवर  झालेल्या मैत्रीनंतर नग्न अवस्थेतील व्हिडिओ कॉलचा स्क्रीन रेकॉर्डिंग करुन तो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीने तरुणाकडून तब्बल साडेपाच लाख रुपयांची खंडणी वसुल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
 
याप्रकरणी धानोरीत राहणार्‍या एका ३५ वर्षाच्या तरुणाने विश्रांतवाडी पोलिसांकडे  फिर्याद दिली आहे. हा प्रकार २९ मे २०२१ मध्ये घडला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झिनत शर्मा असे नाव धारण करणार्‍या तरुणीने फिर्यादीबरोबर फेसबुक अकाऊंटवरुन मैत्री केली. तिने फेसबुक मॅसेंजरवर व्हिडिओ कॉल केला. त्यावर ती नग्न अवस्थेत होती.
 
तिने फिर्यादी यांनाही तसे करण्यास सांगितले. तिच्या सांगण्याप्रमाणे त्याने कृती केल्यावर तिने हा व्हिडिओ कॉलचा स्क्रीन रेकॉर्ड करुन ठेवला. त्यानंतर फिर्यादीला तो व्हायरल करण्याची धमकी दिली. तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी वेळोवेळी फिर्यादीकडून दोन बँक खात्यात ५ लाख ५४ हजार १०० रुपये खंडणी स्वरुपात पाठविण्यास सांगितले. साडेपाच लाख रुपये दिल्यानंतरही तिची मागणी न थांबल्याने शेवटी या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.