मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (08:22 IST)

२४ फेब्रुवारीला भाजपाकडून राज्यभरात २८७ ठिकाणी जेलभरो आंदोलन

राज्यात वीज विभागाकडून शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांवर करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ, २४ फेब्रुवारीला भाजपाकडून राज्यभरात २८७ ठिकाणी जेलभरो आंदोलन केलं जाणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत एवढं तीव्र आंदोलन झालं नसेल, तेवढं तीव्र आंदोलन केलं जाणार आहे, अशी घोषणा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारपरिषदेत केली. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची देखील उपस्थिती होती.
 
“महाराष्ट्रात वीज विभागाकडून संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांची व घरगुती वीज तोडणे आणि ते देखील दमदाटी करून, पोलिसांच्या बळाचा वापर करून. महाराष्ट्रात यापूर्वी या पद्धतीने कधीही या मोगलशाही पद्धतीने कारभार केला गेला नाही, मात्र असं काम मागील आठ ते पंधरा दिवसांपासून वीज खात्याकडून सुरू झालं आहे.” असं यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.