मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 एप्रिल 2022 (21:30 IST)

दुचाकीवर गुलमोहरचे झाड पडल्याने एकाचा मृत्यू

नाशिक लेखानगर येथे दुचाकीवर गुलमोहरचे झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अतुल गांगुर्डे (वय 35) रा. एकलहरा कॉलनी हे मृत व्यक्तीचे नाव आहे. गांगुर्डे हे दुचाकीच्या मागे बसले होते. झाड पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिस व अग्नीशामक दलाला दिली. त्यानंतर घटनास्थळी अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक शेख व सिडको अग्नीशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले. अग्नीशामक दलाचे कर्मचारी यांनी रस्त्यावरील झाड काढून वाहतुक सुरळीत केली.