1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 27 एप्रिल 2022 (16:17 IST)

आरफळ कालव्यात वाहून गेल्या 2 मुली

सांगलीतील विसापूर येथे कपडे धुण्यसाठी गेलेल्या दोन मुली कालव्यात पडल्या त्यात एका मुलीचा मृतदेह सापडला, तर दुसरीचा शोध सुरू होता. ही दुर्दैवी घटना काल, मंगळवारी दुपारी घडली. आरोही विक्रम गुजले वय 4 वर्ष हिचा मृतदेह सापडला आणि दुर्गा कुमार मदने वय 18 वर्षे बेपत्ता आहे.  
 
 या दोन्ही मुली आरफळ कालव्यावर कपडे धुण्यसाठी उतरल्या होत्या. कपडे धुताना आरोही कालव्यात पडली. तिला वाचवण्यसाठी दुर्गाने पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्देवाने दोघीही बुडाल्या. त्यांची आरडाओरड ऐकून जवळत शेतात काम करत असलेल्या शेतकर्‍यांनी मदतीसाठी धाव घेतली. आरोहीला लगेच पाण्याबाहेर गाढले मात्र ती वाचू शकली नाही. दरम्यान पाण्याा वेग असल्याने दुर्गा वाहून गेली.