मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , बुधवार, 27 एप्रिल 2022 (17:21 IST)

विहिरीत चार मृतदेह आढळल्याने नाशिक हादरलं

नाशिक जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी विहिरीतून चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
 
नाशिकमधील सटाणा (Satana)आणि लासलगाव (Lasalgaon)परिसरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार मृतदेह सापडले आहेत. एका घटनेत दीर-भावजयी तर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात दोन तरुणांचे मृतदेह सापडले. नाशिकच्या ग्रामीण भागात तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. लासलगाव परिसरातील निफाडच्या देवगाव येथे तीन घटना घडल्या.
 
नात्याने दिर-भावजयी असलेले पायल पोटे आणि संदीप पोटे या दोघांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सदर घटना आत्महत्या आहे की त्यांचा खून करण्यात आला या बाबत उलट-सुलट चर्चा होत आहेत. सटाणा येथे एका तरुणाचा तर ठेंगोडा येथील येथे विहिरीत शेत मजुराचा मृतदेह आढळून आला आहे.
 
भाऊ नेहमी शिवीगाळ करून त्रास दिल्याने बहिणीने अखेरचे पाऊल उचलत आपल्या लहान भावाच्या पोटात चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मनमाडमध्ये घडली आहे. भाऊ-बहिणीची प्रतिमा मलिन करणाऱ्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.