गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (21:37 IST)

एकट्या राहणाऱ्या आजीला आले एक लाखाचे वीज बील

घरात एकट्या राहणाऱ्या आजीला महावितणने मोठा धक्काच दिला आहे. मुंबईच्या नालासोपारा पश्चिमेच्या एका जुन्या इमारती मध्ये राहणाऱ्या 70 वर्षीय आजीला महावितरणाकडून तब्बल एक लाखाचे बिल पाठविल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 
 
क्रसेल मारिया असं या आजीचे नाव असून ती घरात एकटी राहते. दर महिन्याला या आजीला पंखे व लाईट चे असे दोनशे ते अडीजचे बिल येत होते.  मात्र या महिन्याचे तिला तब्बल 97,520 रुपये आल्याचे कळाले तेव्हा ती थोडक्यात हार्ट अॅटॅकच्या धक्क्यातून बचावली. महावितरणाच्या या भोंगळ कारभारामुळे आजीची तब्येत खालावली आहे. दुसरीकडे  महावितरणाच्या कारभाराविरोधात रहिवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.