1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नांदेड , शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (18:55 IST)

कार आणि दुचाकीचा भीषण अपघातात पती-पत्नीसह 3 जण ठार

Husband and wife killed in car and two-wheeler accident
सकाळी ९ वाजताच्या सुमारास  कंधार – जांब या राज्य महामार्गावर कार व दुचाकीचा अपघात होऊन वृध्द पती- पत्नीसह तीन ठार झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातामध्ये एक जखमी असल्यातंही सांगण्यात येत आहे.  
 
सध्या एसटी महामंडळाचा संप सुरू असल्याने लोक प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर करताना दिसत आहेत. यातच आठवडी बाजार असल्याने दुचाकीवरुन फुलाबाई राठोड वय ५५ वर्ष, सुर्यकांत राठोड वय ६० वर्ष, संजना राठोड वय ३ वर्ष यापैकी दुचाकीवरील संजना राठोड ही चिमुकली जखमी झाली असुन दोघे जागीच ठार तर फुलाबाई राठोड या जांब बु प्रा.आ. केंद्रात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.
 
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पोलीस निरीक्षक गजानन काळे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर ठाकुर, किरण वाघमारे, मारोती मेकलेवाड घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. तर या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.