1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (15:59 IST)

बैल कितीही हट्टी असला तरी,शेतकरी आपले शेत नांगरतो, संजय राउत यांचे ट्वीट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “बैल कितीही हट्टी असला तरी,शेतकरी आपले शेत नांगरतो.”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.  “ज्या पद्धतीने ईस्ट इंडियाच्या लोकांनी जालियनवाला बागमध्ये आमच्या विरांना चिरडलं, तसेच लखीमपूर खेरीत सुद्धा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी जालियनवाला बागेप्रमाणे शेतकऱ्यांना चिरडून मारले. म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त होतं.
 
“कृषी कायदे मागे घेतल्यानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणावात, दबावात, दहशतीत होता ते जोखड आता निघालंय. स्वातंत्र्य काय असतं? कंगना रणौत, विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरील जोखड जेव्हा निघून जातं ते स्वातंत्र्य असतं. शेतकऱ्याला त्याच्या आपल्या शेतीचा मालक नाही तर गुलाम बनवणारे हे कायदे होते.” असे देखील संजय राऊत म्हणाले.