बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (15:51 IST)

तुपकर यांच्याकडून अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याची घोषणा

फोटो साभार - सोशल मीडिया 
 सोयाबीन आणि कापसाला हमी भाव मिळावा यासाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे गेल्या चार दिवसांपासून बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनामुळे तुपकरांची प्रकृती दिवसेंदिवस अधिक ढासळली. अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याने तुपकर यांनी स्वत: आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.
दरम्यान अन्नत्याग आंदोलनामुळे काल रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे या आंदोलनाला  हिंसक वळण लागले होते. दरम्यान आक्रमक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवला. प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले होते. यातील एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आंदोलन आणखीच चिघळले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर- औरंगाबाद राज्य महामार्गावरील वाहतूक थांबवत रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली, तसेच पोलिसांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या. दरम्यान आंदोलन शांत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करत तुपकरांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. या ठिकाणी आता पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.