1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

ऑनलाइन खरेदी केलेली साडी रीफंड करणे पडले महागात, अकाउंटहून 75 हजार रुपये गायब

online fraud with Mumbai women
मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. आरोपीने एका 26 वर्षीय महिलेसोबत ऑनलाइन फ्रॉड केल्याची बातमी आहे. आरोपीने स्वत:ला एका शॉपिंग पोर्टलचा कस्टमर सर्व्हिस एग्जीक्यूटिव सांगून महिलेच्या अकाउंटमधून 75 हजार रुपये काढून घेतले.
 
पोलिसांप्रमाणे तक्रार नोंदवणार्‍या महिलेने ऑनलाइन शॉपिंग पोर्टलहून 1100 रुपये किमतीची साडी खरेदी केली होती परंतू साडीत काही फॉल्ट असल्यामुळे रीफंड करण्याचे ठरवले. महिलेने रीफंड करण्यासाठी कंपनीच्या कस्टमर केयरवर फोन केला.
 
नंतर महिलेकडून फोनवर त्यांचा अकाउंट नंबर आणि आयएफएससी (भारतीय वित्तीय प्रणाली कोड) मागितला गेला. नंतर 25 मार्चला महिलेच्या फोनवर बँकेकडून मेसेज आला. ज्यात अकाउंटमधून 75 हजार रुपये काढले गेले होते.
 
सूत्रांप्रमाणे महिलेने म्हटले की "बँकप्रमाणे मी पैसे एटीएममधून काढले अर्थातच आरोपीने माझ्या डेबिट कार्डाचा क्लोन तयार करुन हा धोका केला आहे."