गुरूवार, 6 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जून 2023 (08:02 IST)

मुंबई विद्यापीठाकडून पुनर्मूल्यांकन अर्जाची ऑनलाइन प्रक्रिया सुरु

process of revaluation
मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या उन्हाळी सत्रातील विविध अभ्यासक्रमांचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत, तर काही अभ्यासक्रमांच्या निकालाची विद्यार्थ्यांना अद्यापही प्रतीक्षा आहे. जाहीर झालेल्या निकालामध्येही असंख्य त्रुटी आढळल्या असून विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन आणि छायांकित प्रतीसाठीचे अर्ज व यासाठीचे विहित शुल्क ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या http://www.mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त करता येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor