1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 (19:53 IST)

Palghar : इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून डोकावताना पडून चिमुकलीचा मृत्यू

child death
Palghar :घरात लहान मुळे असताना खूप काळजी घेण्याची गरज असते. मुलांकडे दुर्लक्ष केल्यास अपघात घडू शकतात. मुलांना खेळताना पालकांनी सावध असणे महत्त्वाचे आहे. उंच इमारतीत घर असल्यास मुलांना खिडकीतून डोकावू देऊ नका. इमारतीच्या खिडकीतून पडून मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडतात. या अपघातामुळे चिमुकले बळी होतात. असेच काहीसे घडले आहे पालघर जिल्ह्यात .

पालघरच्या एका बहूमजलीतील चौथ्या मजल्यावरील खिडकीतून आई-वडिलांना डोकावून बघताना तोल जाऊन खाली पडून एका चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. 

पालघरच्या एका बहुमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही चिमुकली आपल्या आई-वडिलांसह राहत होती. मुलीची आई आपल्या मुलीला घरात एकटी सोडून तिच्या वडिलांना सोडण्यासाठी बाहेर गेली असता ही चिमुकली घराच्या ग्रील नसलेल्या खिडकीतून आपल्या आई-वडिलांना डोकावून पाहत असताना तिचा तोल गेला आणि ती चौथ्या मजल्यावरून खाली पडून तिचा दारुण अंत झाला. 
 
तिला खिडकीतून खाली पडताना इमारतीतील एका रहिवाशांनी बघितले. आणि त्याने आरडाओरड केली. स्थानिकांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेची अपघाती मृत्यू असल्याची नोंद केली आहे. 

तिच्या मृत्यू नंतर आई-वडिलांनी टाहो फोडला. चिमुकली आपल्या आई- वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. तिच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या आई-वडिलांनी तिचे डोळे आणि अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
Edited by - Priya Dixit