बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (11:04 IST)

माझ्या नाराजीचे वृत्त चुकीचे : पंकजा मुंडे

मराठा उपसमितीच्या बैठकीत मी नाराज होऊन निघून गेल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा महिला व बालकल्याणंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. नाराज होऊन नाही तर सदस्य नसल्यामुळे मराठा उपसमितीच्या बैठकीसाठी थांबले नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
 
मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या बैठकीत मुंडे गेल्या होत्या. त्या बैठकीत सदस्य नसतानाही त्यांनी काही मुद्दे मांडले. हे मुद्दे समितीने स्वीकारले नाहीत म्हणून नाराज होऊन मुंडे समितीच्या बैठकीतून बाहेर पडल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी त्यांची नाराजी कळवली अशी बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. ही बामती खोटी असल्याचा खुलासा खुद्द पंकजा मुंडे यांनी केला आहे.