गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 नोव्हेंबर 2023 (17:45 IST)

पनवेल: पाण्याच्या बादलीत पडून 10 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

child death
घरात लहान मुलं असले तर घरातील सदस्यांना बारीक लक्ष ठेवावे लागते अन्यथा काहीही अपघात होऊ शकतात. असेच काहीसे घडले आहे पनवेलच्या  पळस्पे गावात पाण्याच्या बादलीत पडून एका 10 वर्षाच्या मुलाचं दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

पनवेलच्या पळस्पे गावात घरात मुलगा खेळत असताना त्याचा तोल गेला आणि तो भरलेल्या पाण्याच्या बादलीत जाऊन पडला त्यात त्याच्या जीव गुदमरला आणि त्याचा मृत्यू झाला. 
त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. पनवेल पोलीस ठाण्यात त्याच्या मृत्यची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या घटनेमुळं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 




Edited by - Priya Dixit