1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2023 (12:11 IST)

पेण : सर्पदंशाने चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

snake
सध्या सर्वत्र पावसाळा सुरु आहे. जमिनीच्या खाली राहणारे प्राणी जमिनीत पाणी मुरल्यामुळे बाहेर पडतात.आणि कोरड्या ठिकाणी वास्तव्य करतात. अशा परिस्थितीत हे जमिनीवर सरपटणारे जंत माणसाच्या घरात देखील शिरतात. या दिवसांत सर्पदंशाच्या घटना सातत्यानं वाढतात. अशीच एक घटना पेण येथे घडली आहे. पेण तालुक्यातील जिते गावात सर्पदंशाने एका 12 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सारा ठाकूर असे या मुलीचं नाव आहे. तिला मण्यार जातीचा सापाने चावा घेतला. वेळीच उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. साराच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. 
 
सारा ठाकूर या चिमुकलीला मण्यार जातीचा साप चावला तिला तातडीनं उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तिथे तिला उपचार मिळाला  नसल्यामुळे पेणच्या खासगी रुग्णालयात नेले. तिथे देखील तिला उपचार मिळाले नाही. अखेर तिला अलिबाग जिल्ह्यातील रुग्णालयात नेले मात्र तिथे देखील तिला उपचार मिळाले नाही. नंतर तिला कळंबोलीच्या रुग्णालयात नेण्यात आले असता उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. उपचाराअभावी तिचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला जबाबी दार धरले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit