शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (15:06 IST)

मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी

uddhav
मुख्यमंत्र्यांच्या या सभेला पोलिसांनी 15 अटींसह परवानगी दिली आहे. शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील मराठवाडा कल्चरल सर्कलच्या मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. बैठकीत या 15 अटींचे पालन करावे लागेल, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो.  
 
मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत 8 जून 1985 रोजी स्थापन झाली. या शाखेच्या 37व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यासाठी गेल्या महिन्यापासून शिवसेनेकडून तयारी सुरू आहे. मात्र सभेला चार दिवस शिल्लक राहिले असताना पोलिसांची परवानगी मिळाली नसल्याचे मोठी चर्चा होत होती पण औरंगाबाद शहर पोलिसांनी आज या सभेला परवानगी दिली आहे.