महाराष्ट्रसह आठ राज्यांमधील पेट्रोल पंप आता दर रविवारी बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन वाचवा या आवहनाच्या पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोलियम वितरकांच्या संघटनेने महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. त्यानुसार येत्या 14 मे पासून आठ राज्यांमधील पेट्रोल पंप दर रविवारी बंद राहतील. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलगंणा, महाराष्ट्र, हरियाणा या राज्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे या राज्यांमध्ये अंदाजे 20 हजार पेट्रोल पंप प्रत्येक रविवारी बंद राहतील, अशी माहिती पेट्रोलिटम वितरक संघटनेच्या कार्यकारिणीचे सदस्या सुरेश कुमार यांनी दिली.
केवळ रूग्णवाहिका आणि आपतकालीन सेवेच्या वाहनांनाच रविवारी पेट्रोल भरून दिले जाईल. त्यासाठी रविवारी पेट्रोल पंपावर एक कर्मचारी उपलब्ध असेल.