बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (21:02 IST)

कीर्तनकार असलेल्या एका स्त्री आणि पुरुषाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

poison
मराठवाड्याची राजधानी असलेल्या  औरंगाबादेत येथील कीर्तनकार असलेल्या एका स्त्री आणि पुरुषाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील 48 वर्षांचे एक कीर्तनकार आणि सिल्लोडच्या 40 वर्षीय महिला कीर्तनकारांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही कीर्तनकार नको त्या अवस्थेत आहेत. कीर्तनकार म्हणवणाऱ्या या दोन्ही व्यक्तींची जिल्ह्यात एकच चर्चा आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध 48 वर्षीय पुरूष कीर्तनकार आणि सिल्लोडच्या 40 वर्षीय महिला कीर्तनकाराचा हॉटेलमधील अश्लील व्हिडीओने जिल्हात खळबळ उडाली आहे. या महाराजानेच हा व्हिडीओ बनवल्याचं या क्लिपमध्ये स्पष्ट दिसत आहे. 3 मिनीटांच्या या व्हिडीओमध्ये हे दोघेही अश्लील चाळे करीत असतांना दिसतंय. गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.. 
 
किर्तनकार जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आपली बदनामी होत आहे, हे लक्षात आल्यानंतर महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे पुरुष किर्तनकारानंही काही टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून महाराजांवर त्यांचे नातेवाईक लक्ष ठेवून आहेत.
 
अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी वारकरी संप्रदायातून करण्यात येत आहे. यातील पुरुष किर्तनकार ४८ वर्षाचे असून ते वैजापूर तालुक्यातील आहे. तर महिला किर्तनकार ४० वर्षांच्या असून सिल्लोड तालुक्यातील आहेत.