शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (16:33 IST)

प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना थेट धमकी?; म्हणाले – ‘बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का?’

गलूर विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त  वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित केली होती. या दरम्यान वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना थेट धमकीच दिली आहे. ‘बायको सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा’ असं प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाणांवर थेट निशाणा साधला आहे.
 
‘आदर्श प्रकरण पुन्हा काढायचे का? अशी धमकीच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उघडपणे अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) दिली आहे. एक मोर्चा हायकोर्टावर गेला की, तुम्ही दडवलेली फाईल पुन्हा बाहेर येईल आणि सुशीलकुमार शिंदे यांना देखील जेलमध्ये घेऊन जाईल, असा इशारा देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
 
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की, ‘अशोकराव बोलले वंचितच्या गाडीत पेट्रोल भाजप भरते. अशोकराव, ही चूक आयुष्यात पुन्हा कधी करू नका. निवडणूक होऊ द्या, आमच्या गाडीमध्ये कुणी-कुणी पेट्रोल भरलं हे राहु द्या, आम्ही हायकोर्टात विचारतो आदर्श प्रकरणात कुणाकुणाचा फ्लॅट आहे. अशोक चव्हाण आपणाला बायको आणि सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा? अशा कडक शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाणांवर घणाघात केला आहे.