मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (15:38 IST)

अमित शाहांच्या उपस्थितीत होणाऱ्या सहकार परिषदेची जोरदार तयारी सुरु

नगर  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या राज्यातील पहिल्या सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.(Minister Amit Shah)
सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर करण्यात आली आहे
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या सहकार परिषदेस रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, तसेच खासदार,
आमदार आणि सहकारी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात प्रथमच स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचा पदभार स्विकारल्यानंतर सहकार मंत्री अमित शाह प्रथमच नगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे येत असल्याने या दौर्‍याचे महत्त्व राज्याच्यादृष्टीने विशेष मानले जाते.केंद्र सरकारने सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बँका यांच्या बाबतीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची अंलबजावणी सुरू झाली आहे.
या व्यतिरिक्त महाराष्ट्रात रुजलेल्या सहकार चळवळीच्या दृष्टीने मंत्री अमित शाह कोणती घोषणा करतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
पद्म पुरस्काराने सन्मानित झालेले जिल्याचे भुमीपुत्र पद्मश्री पोपटराव पवार आणि श्रीमती राहीबाई पोपेरे यांचा गौरव तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. रमेश धोंडगे, डॉ. तारा भवाळकर यांचा सन्मान मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.