सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (08:14 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबईला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबईला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अंधेरी पूर्व, मुंबईतील मरोळ बोहरा कॉलनीमध्ये बोहरा मुस्लिम समुदायाने स्थापन केलेल्या अल जामिया तुस सैफिया या विद्यापीठाचे उद्घाटन करतील. यासाठी पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनीही चार तास जागेची पाहणी केली.
 
अंधेरी पूर्व येथील मरोळ परिसरात बोरी कॉलनी परिसर आहे. या परिसरात बोरी मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात राहतो. या परिसरात मोठी झोपडपट्टी आहे. त्यामुळे पोलिसांसमोर सुरक्षेचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे पोलीस दहा ते बारा दिवस आधीच सुरक्षेची तयारी करत आहेत. आतापासून येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काल (29 जानेवारी) दुपारी चार तास बोरी कॉलनीतील सुरक्षेची पाहणी केली.
 
सीएसएमटी साईनगर शिर्डी आणि सोलापूर सीएसएमटी दरम्यान दोन वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यासाठी पंतप्रधान या दरम्यान हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएसएमटी येथून वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींची महिन्याभरातील ही दुसरी भेट असेल. 19 जानेवारीला मोदी मुंबईत अनेक प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी मुंबईत आले होते. पंतप्रधानांनी मेट्रो 2Aआणि मेट्रो 7 मार्गांचे उद्घाटन केले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor