शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 मार्च 2023 (16:36 IST)

पंतप्रधानांचे आदर करावे, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्ला बोल

राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन शेवटच्या टप्प्यावर आहे. सत्ताधारी पक्षाकडून काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले होते. या वरून काँग्रेसने कारवाई करण्याची आक्रमक भूमिका घेतली. या साठी काँग्रेसने विधिमंडळाच्या आवारात मोठा गदारोळ केला. यावरून विधानसभेच्या अध्यक्षांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचे म्हटले.आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलाच हल्ला बोल केला आहे. ते म्हणाले आम्ही विधिमंडळाच्या आवारात जे घडले त्याचा पक्ष घेत नाही पण गेल्या आठ महिन्यांपासून आमचा जो काही अपमान होत आहे. पन्नास खोके, म्हणत आमचा अपमान केला गेला ते विरोधी पक्षाला करणे योग्य आहे का ? हे कुठल्या आचारसंहितेत बसत आहे ? असा सवाल त्यांनी विरोधांना केला. तसेच आपल्या देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केला तर आम्ही आणि देशातील जनता ते सहन करणार नाही. बोलताना त्यांच्या विषयी आदर राखलाच पाहिजे. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. 
 
Edited By- Priya Dixit