शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

25 ऑक्टोबर पूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगार होणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार देण्याचा निर्णयावरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे येत्या 25 ऑक्टोबर पूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारकडून दिवाळीपूर्वी म्हणजेच 25 ऑक्‍टोबरच्या पूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. लेखा कोषागार विभागातील कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने वित्त विभागाला आगावू पगार करता येणार नसल्याचं कारण देण्यात आलं होते.
 
यामुळे पेन्शनधारकांसह सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जोरात होणार असल्याचं चित्र होतं. सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहिन्याच्या 1 तारखेला पगार दिला जातो. पण यंदा दिवाळी महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 25 तारखेला असल्यामुळे लवकरच पगार दिला जाणार आहे.