रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2024 (20:49 IST)

पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीचा निरीक्षणगृहातील मुक्काम 12 जून पर्यंत वाढला

19 मे 2024 च्या पहाटे पुण्याच्या कल्याणीनगर भागात एका अतिवेगानं जाणाऱ्या पोर्शे कारनं दुचाकीवरच्या दोघांना उडवलं. त्या दोघांचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला.

या अपघातात अनिश अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले. अनिश आणि अश्विनी या दोघांची काहीही चूक नसताना फक्त एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवत त्या दोघांना धडक दिली. ज्यामध्ये त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले.हा अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचं समोर आले असून पोलिसांनी त्याला अटक केली.

अल्पवयीन मुलाला 15 तासांच्या आत जामीन मिळाला. नंतर न्यायालयाच्या आणि पोलिसांच्या निर्णयावर टीका करण्यात आली. नंतर बाल न्याय मंडळाने आपला निर्णय बदलत अल्पवयीन मुलाला 14 दिवसांसाठी   बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले.आता अल्पवयीन मुलाला 12 जून पर्यंत बाल निरीक्षण गृहात ठेवण्यास न्यायालयाची परवानगी दिली आहे.
 
त्यानंतर या प्रकरणी मुलाचे आई वडील, आजोबा आणि तो ज्या पबमध्ये दारु प्यायला होता, त्या ठिकाणच्या मॅनेजर, तसंच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ससून हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांना रक्त नमुना चाचणीत फेर केल्याबाबद्दल अटक करण्यात आली होती.
 
पोर्शे अपघात प्रकरणात अटक झालेल्या पालकांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी तर डॅाक्टरांना 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आता पर्यंत एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. 

Edited by - Priya Dixit