बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जून 2018 (09:50 IST)

बनराव पाचपुते भीषण अपघातातून थोडक्यात बचावले

pune
बनराव पाचपुते भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या गाडीला शिरुरजवळ रात्री भीषण अपघात झाला. पाचपुते यांच्या गाडीला रात्री 10.30 च्या सुमारास शिरुरजवळ कानीफनाथ फाटा परीसरातील हाटेल सदगुरू वडेवाले इथे भीषण अपघात झाला. पाचपुते यांची कार मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला धडकली आहे. यामध्ये गाडीचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. ट्रकला मागील बाजूस  पाचपुतेंची कारही जोरदार आदळली  आहे. या भीषण अपघातात नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते यांना कुठलीही ईजा झाली नाही. ते सुखरूप असून त्यांची अनेकांनी चौकशी केली आहे.