रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जून 2022 (08:21 IST)

इचलकरंजीतील मटका बुकीवर छाप; अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

money
मटकाकिंग अग्रवाल याच्या शहरातील मटकाबुकीवर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच मटकाकिंग सुभाष अग्रवाल ( रा. सहकारनगर, इचलकरंजी ) आणि बुकी मालक संपत नवनाळे ( रा. वेताळ पेठ, इचलकरंजी ) हे पळून गेले. तर बुकीमध्ये काम करीत असलेल्या सहा जणांना अटक केली गेली आहे. त्याच्याकडून ७ हजार ५०० रुपयांसह तीन दुचाकी, एक प्रिंटर आणि जुगाराचे साहित्य असा २ लाख ४१ हजार ३० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली. शहापूर पोलिसात झाली आहे.